मोबाईल नं : + 91 - 8237 45 5686 | फोन नं : 02471 - 242686

॥ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते ॥


भाषा निवडा

जय भवानी !

" श्री तुळजाभवानी मातेच्या पावन भूमीत येणाऱ्या सर्व भाविकांचे राजगड भक्त निवास, तुळजापूर तर्फे
सहर्ष स्वागत."

राजगड भक्त निवास


आमच्याबद्दल - 'राजगड भक्त निवास, तुळजापूर'

श्री तुळजाभवानी मातेच्या पावन भूमीत येणाऱ्या सर्व भाविकांचे 'राजगड भक्त निवास, तुळजापूर' तर्फे हार्दिक स्वागत!

हे एक खाजगी भक्त निवास असून, तुळजापूरला येणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला आणि देवी भक्ताला आपल्या घरच्यासारखे अत्यंत सुरक्षित, पवित्र आणि प्रसन्न वातावरण मिळावे, याच एका ध्येयाने 'राजगड भक्त निवास' ची स्थापना करण्यात आली आहे.

🚫 आमचे कडक नियम
  • 👥 फक्त फॅमिलीसाठी : येथे केवळ कुटुंब आणि देवी भक्तांनाच प्रवेश दिला जातो.
  • 🚭 धूम्रपान आणि मद्यपानास सक्त मनाई.
  • 🟢 १००% शाकाहारी: परिसर पवित्र ठेवण्यासाठी मांसाहार आणण्यास आणि बनवण्यास सक्त मनाई.

  • ⚠️ महत्त्वाची सूचना / बुकिंग पॉलिसी :

    आमचे भक्त निवास केवळ कुटुंब (Families) आणि अधिकृत देवी भक्तांसाठीच राखीव आहे. तीर्थक्षेत्राचे पावित्र्य जपण्याकरिता जर इतर कोणीही (उदा. अविवाहित जोडपे)चुकीची माहिती देऊन ऑनलाईन रूम बुक केली, तर येथे आल्यानंतर त्यांची बुकिंग कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार 'राजगड भक्त निवास' व्यवस्थापनाकडे राहील. नंतर कोणतेही कारण ऐकून न घेता प्रवेश नाकारला जाईल व अँडव्हान्स रक्कम परत मिळणार नाही.

    (चेक-इनच्या वेळी अधिकृत ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.) सविस्तर माहिती


    ऑनलाईन रूम आरक्षण



    2 बेड नॉन एसी रूम (5 व्यक्तींसाठी)

  • ✓ अटॅच इंडियन टॉयलेट बाथरूम
  • ✓ दैनंदिन स्वच्छता व्यवस्था
  • 2 बेड एसी रूम (4 व्यक्तींसाठी)

  • ✓ अटॅच इंडियन टॉयलेट बाथरूम
  • ✓ दैनंदिन स्वच्छता व्यवस्था
  • 3 बेड नॉन एसी रूम (5 व्यक्तींसाठी)

  • ✓ अटॅच टॉयलेट बाथरूम कमोड
  • ✓ दैनंदिन स्वच्छता व्यवस्था
  • इंटरकनेक्टेड रूम्स (8 व्यक्तींसाठी)

  • ✓ अटॅच इंडियन टॉयलेट बाथरूम
  • ✓ दैनंदिन स्वच्छता व्यवस्था
  • हॉल (८ व्यक्तींसाठी)

  • ✓ हॉलच्या समोर हॉल साठी स्वतंत्र इंडियन टॉयलेट बाथरूम.
  • ✓ दैनंदिन स्वच्छता व्यवस्था
  • 3 बेड एसी रूम (5 व्यक्तींसाठी)

  • ✓ अटॅच बाथरूम कमोड
  • ✓ दैनंदिन स्वच्छता व्यवस्था


  • आमची वैशिष्ट्ये आणि सोयी


    हायवे टच आणि मोक्याचे ठिकाण

    आमचे राजगड भक्त निवास तुळजापूर शहरामध्ये मेन हायवे रोड टच आहे. त्यामुळे शहरात कुठेही न अडकता थेट भक्त निवासापर्यंत पोहोचणे अत्यंत सोपे आहे.

    मंदिरापासूनचे अंतर

    भक्त निवासापासून श्री तुळजाभवानी मुख्य मंदिराचे पायी अंतर अवघे ७ ते ८ मिनिटांचे आहे. तसेच, तुम्ही गाडी घेऊन गेल्यास मंदिरापर्यंत केवळ २ मिनिटांत पोहोचू शकता.

    स्वच्छ आणि हवेशीर रूम्स

    कुटुंबासाठी सुसज्ज AC आणि Non-AC रूम्सचे पर्याय उपलब्ध.

    गरम पाण्याची सोय

    भाविकांच्या सुविधेसाठी सकाळी गरम पाणी उपलब्ध करून दिले जाते.

    प्रशस्त पार्किंग

    हायवे टच असल्यामुळे वाहनांसाठी सुरक्षित आणि मोकळी पार्किंग व्यवस्था आहे.

    सुरक्षा व्यवस्था

    संपूर्ण परिसर सीसीटीव्ही (CCTV) देखरेखीखाली सुरक्षित आहे.



    आमच्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया

    "भक्तनिवासातील वास्तव्य अतिशय शांत, स्वच्छ आणि समाधानकारक होते. मंदिराजवळील सोयीस्कर स्थान आणि उत्तम सेवा यामुळे आमचा धार्मिक प्रवास अधिक सुखकर झाला."

    - श्री. राजेश पाटील, पुणे

    "खोल्यांची स्वच्छता, प्रसन्न वातावरण आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य उत्कृष्ट होते. कुटुंबासह राहण्यासाठी उत्तम ठिकाण."

    - सौ. मीनल देशमुख, मुंबई

    "परवडणाऱ्या दरात उत्कृष्ट सुविधा मिळाल्या. भक्तनिवासातील शांत वातावरणामुळे मनाला खूप समाधान मिळाले."

    - श्री. अमोल शिंदे, नाशिक

    "मंदिर दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी हे आदर्श निवासस्थान आहे. स्वच्छ खोल्या आणि तत्पर सेवा यामुळे अनुभव अविस्मरणीय ठरला."

    - श्रीमती वैशाली कुलकर्णी, कोल्हापूर

    "आमच्या संपूर्ण कुटुंबाचा मुक्काम अतिशय आरामदायी झाला. स्वच्छता, सुरक्षितता आणि आध्यात्मिक वातावरण यांचे सुंदर मिश्रण येथे अनुभवायला मिळाले."

    - श्री. संदीप जाधव, मुंबई





    तुळजापूर जवळील भेट देण्यासारखी प्रमुख स्थळे


    श्री क्षेत्र अक्कलकोट (श्री स्वामी समर्थ महाराज)

    श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणे अतिशय सोपे आहे. तुळजापूर ते अक्कलकोट हे अंतर साधारण ८० किमी आहे. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर पुढे श्री क्षेत्र गाणगापूर या भगवान श्री दत्तप्रभूंच्या पवित्र आणि जागृत क्षेत्राला भेट देता येते. या तीनही प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या दर्शनामुळे भक्तांना एकाच प्रवासात देवी, स्वामी समर्थ आणि श्री दत्तप्रभूंचे दिव्य दर्शन घेण्याचा आध्यात्मिक लाभ मिळतो. तुम्ही तुळजापूरला भेट देत असाल, तर या पवित्र यात्रेचा समावेश करून अल्प कालावधीत तीन महान तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याचा अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव नक्की घ्या.

    श्री क्षेत्र गाणगापूर (दत्तगुरूंचे जागृत स्थान)

    श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर भाविकांसाठी पुढील आध्यात्मिक प्रवासाचा अत्यंत पावन सुवर्णयोग म्हणजेच 'श्री क्षेत्र गाणगापूर'. अनेक भाविक तुळजापूरहून निघून अक्कलकोट दर्शन घेतात आणि तिथून पुढे गाणगापूर असा प्रवास करतात; अक्कलकोट मार्गे गाणगापूरचे हे एकूण अंतर साधारण १३० ते १३५ किलोमीटर आहे, जे वाहनाने पूर्ण करण्यासाठी सुमारे ३ ते ४ तास लागतात. कर्नाटक राज्याच्या सीमेत असलेले गाणगापूर हे दत्त संप्रदायातील सर्वोच्च आणि अती जागृत तीर्थक्षेत्र मानले जाते.

    श्री क्षेत्र पंढरपूर दर्शन

    श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर भाविकांसाठी पुढील प्रवासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या विठुरायाचे 'पंढरपूर'. तुळजापूरपासून सोलापूर मार्गे पंढरपूरचे एकूण अंतर साधारण ११५ ते १२० किलोमीटर आहे, जे हायवेने अवघ्या २ ते २.५ तासांत सहज पार करता येते. पंढरपूर हे चंद्रभागेच्या तीरावर वसलेले संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्य भक्ती केंद्र असून, येथे साक्षात परब्रह्म भगवान श्रीकृष्ण 'विठ्ठल' रूपात आणि माता रुक्मिणी भक्तांसाठी युगेयुगे विटेवर उभे आहेत. येथे येणारे भाविक पवित्र चंद्रभागा नदीत स्नान करून, पुंडलिक मंदिराचे दर्शन घेतात आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणावर माथा टेकवून धन्य होतात. आपल्या तुळजापूर आणि सोलापूर दौऱ्यामध्ये पंढरपूरचा समावेश करून भाविक आदिशक्ती मातेच्या दर्शनासोबतच विठ्ठल भक्तीचा अलौकिक आनंद एकाच प्रवासात घेऊ शकतात.