॥ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते ॥


Change Language
आमच्याबद्दल

'राजगड भक्त निवास, तुळजापूर'

आमच्याबद्दल - 'राजगड भक्त निवास, तुळजापूर'

श्री तुळजाभवानी मातेच्या पावन भूमीत येणाऱ्या सर्व भाविकांचे 'राजगड भक्त निवास, तुळजापूर' तर्फे हार्दिक स्वागत!

तुळजापूरला येणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला आणि देवी भक्ताला आपल्या घरच्यासारखे अत्यंत सुरक्षित, पवित्र आणि प्रसन्न वातावरण मिळावे, याच एका ध्येयाने 'राजगड भक्त निवास'च स्थापना करण्यात आली आहे.

🚫 आमचे कडक नियम
  • 👥 फक्त फॅमिलीसाठी : येथे केवळ कुटुंब आणि देवी भक्तांनाच प्रवेश दिला जातो.
  • 🚭 धूम्रपान आणि मद्यपानास सक्त मनाई.
  • 🟢 १००% शाकाहारी: परिसर पवित्र ठेवण्यासाठी मांसाहार आणण्यास आणि बनवण्यास सक्त मनाई.

  • ⚠️ महत्त्वाची सूचना / बुकिंग पॉलिसी :

    आमचे भक्त निवास केवळ कुटुंब (Families) आणि अधिकृत देवी भक्तांसाठीच राखीव आहे. तीर्थक्षेत्राचे पावित्र्य जपण्याकरिता जर इतर कोणीही (उदा. अविवाहित जोडपे)चुकीची माहिती देऊन ऑनलाईन रूम बुक केली, तर येथे आल्यानंतर त्यांची बुकिंग कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार 'राजगड भक्त निवास' व्यवस्थापनाकडे राहील. नंतर कोणतेही कारण ऐकून न घेता प्रवेश नाकारला जाईल व अँडव्हान्स रक्कम परत मिळणार नाही.

    (चेक-इनच्या वेळी अधिकृत ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.)


    आमची वैशिष्ट्ये आणि सोयी


    हायवे टच आणि मोक्याचे ठिकाण

    आमचे राजगड भक्त निवास तुळजापूर शहरामध्ये मेन हायवे रोड टच आहे. त्यामुळे शहरात कुठेही न अडकता थेट भक्त निवासापर्यंत पोहोचणे अत्यंत सोपे आहे.

    मंदिरापासूनचे अंतर

    भक्त निवासापासून श्री तुळजाभवानी मुख्य मंदिराचे पायी अंतर अवघे ७ ते ८ मिनिटांचे आहे. तसेच, तुम्ही गाडी घेऊन गेल्यास मंदिरापर्यंत केवळ २ मिनिटांत पोहोचू शकता.

    स्वच्छ आणि हवेशीर रूम्स

    कुटुंबासाठी सुसज्ज AC आणि Non-AC रूम्सचे पर्याय उपलब्ध.

    गरम पाण्याची सोय

    भाविकांच्या सुविधेसाठी सकाळी गरम पाणी उपलब्ध करून दिले जाते.

    प्रशस्त पार्किंग

    हायवे टच असल्यामुळे वाहनांसाठी सुरक्षित आणि मोकळी पार्किंग व्यवस्था आहे.

    सुरक्षा व्यवस्था

    संपूर्ण परिसर सीसीटीव्ही (CCTV) देखरेखीखाली सुरक्षित आहे.