हे एक खाजगी भक्त निवास असून, तुळजापूरला येणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला आणि देवी भक्ताला आपल्या घरच्यासारखे अत्यंत सुरक्षित, पवित्र आणि प्रसन्न वातावरण मिळावे, याच एका ध्येयाने 'राजगड भक्त निवास' ची स्थापना करण्यात आली आहे.
🚫 आमचे कडक नियमआमचे भक्त निवास केवळ कुटुंब (Families) आणि अधिकृत देवी भक्तांसाठीच राखीव आहे. तीर्थक्षेत्राचे पावित्र्य जपण्याकरिता जर इतर कोणीही (उदा. अविवाहित जोडपे)चुकीची माहिती देऊन ऑनलाईन रूम बुक केली, तर येथे आल्यानंतर त्यांची बुकिंग कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार 'राजगड भक्त निवास' व्यवस्थापनाकडे राहील. नंतर कोणतेही कारण ऐकून न घेता प्रवेश नाकारला जाईल व अँडव्हान्स रक्कम परत मिळणार नाही.
(चेक-इनच्या वेळी अधिकृत ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.) सविस्तर माहितीआमचे राजगड भक्त निवास तुळजापूर शहरामध्ये मेन हायवे रोड टच आहे. त्यामुळे शहरात कुठेही न अडकता थेट भक्त निवासापर्यंत पोहोचणे अत्यंत सोपे आहे.
भक्त निवासापासून श्री तुळजाभवानी मुख्य मंदिराचे पायी अंतर अवघे ७ ते ८ मिनिटांचे आहे. तसेच, तुम्ही गाडी घेऊन गेल्यास मंदिरापर्यंत केवळ २ मिनिटांत पोहोचू शकता.
कुटुंबासाठी सुसज्ज AC आणि Non-AC रूम्सचे पर्याय उपलब्ध.
भाविकांच्या सुविधेसाठी सकाळी गरम पाणी उपलब्ध करून दिले जाते.
हायवे टच असल्यामुळे वाहनांसाठी सुरक्षित आणि मोकळी पार्किंग व्यवस्था आहे.
संपूर्ण परिसर सीसीटीव्ही (CCTV) देखरेखीखाली सुरक्षित आहे.
श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणे अतिशय सोपे आहे. तुळजापूर ते अक्कलकोट हे अंतर साधारण ८० किमी आहे. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर पुढे श्री क्षेत्र गाणगापूर या भगवान श्री दत्तप्रभूंच्या पवित्र आणि जागृत क्षेत्राला भेट देता येते. या तीनही प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या दर्शनामुळे भक्तांना एकाच प्रवासात देवी, स्वामी समर्थ आणि श्री दत्तप्रभूंचे दिव्य दर्शन घेण्याचा आध्यात्मिक लाभ मिळतो. तुम्ही तुळजापूरला भेट देत असाल, तर या पवित्र यात्रेचा समावेश करून अल्प कालावधीत तीन महान तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याचा अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव नक्की घ्या.
श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर भाविकांसाठी पुढील आध्यात्मिक प्रवासाचा अत्यंत पावन सुवर्णयोग म्हणजेच 'श्री क्षेत्र गाणगापूर'. अनेक भाविक तुळजापूरहून निघून अक्कलकोट दर्शन घेतात आणि तिथून पुढे गाणगापूर असा प्रवास करतात; अक्कलकोट मार्गे गाणगापूरचे हे एकूण अंतर साधारण १३० ते १३५ किलोमीटर आहे, जे वाहनाने पूर्ण करण्यासाठी सुमारे ३ ते ४ तास लागतात. कर्नाटक राज्याच्या सीमेत असलेले गाणगापूर हे दत्त संप्रदायातील सर्वोच्च आणि अती जागृत तीर्थक्षेत्र मानले जाते.
श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर भाविकांसाठी पुढील प्रवासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या विठुरायाचे 'पंढरपूर'. तुळजापूरपासून सोलापूर मार्गे पंढरपूरचे एकूण अंतर साधारण ११५ ते १२० किलोमीटर आहे, जे हायवेने अवघ्या २ ते २.५ तासांत सहज पार करता येते. पंढरपूर हे चंद्रभागेच्या तीरावर वसलेले संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्य भक्ती केंद्र असून, येथे साक्षात परब्रह्म भगवान श्रीकृष्ण 'विठ्ठल' रूपात आणि माता रुक्मिणी भक्तांसाठी युगेयुगे विटेवर उभे आहेत. येथे येणारे भाविक पवित्र चंद्रभागा नदीत स्नान करून, पुंडलिक मंदिराचे दर्शन घेतात आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणावर माथा टेकवून धन्य होतात. आपल्या तुळजापूर आणि सोलापूर दौऱ्यामध्ये पंढरपूरचा समावेश करून भाविक आदिशक्ती मातेच्या दर्शनासोबतच विठ्ठल भक्तीचा अलौकिक आनंद एकाच प्रवासात घेऊ शकतात.